Breaking News

पुणेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुणेवाडी ग्रामपंचायतच्या 14 व्या वित्त आयोगामधून होणार्‍या विविध विकास कामांचे भूमीपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रभाजी पूजारी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब रेपाळे, माजी सरपंच सुहास पुजारी, माजी सरपंच भास्कर पोटे, व्हा. चेअरमन बाबाजी पोटे, उपसरपंच विशाल दुस्मान, शिक्षक नेते संभाजी औटी, अरुण रेपाळे, ग्रा. पं. सदस्य गोरख पोटे, ग्रा. पं. सदस्य अमोल रेपाळे, ग्रा. पं. सदस्य स्वप्निल पुजारी, भिकाजी रेपाळे, भाऊसाहेब चेडे, बन्शी रेपाळे, सयाजी बोरूडे, मोहन रेपाळे, अ‍ॅड. बाळासाहेब सोनवणे, मुख्याध्यापक पळस्कर, सचिन पोटे, वैभव पोटे, अक्षय पुजारी, सुभाष रेपाळे, इंजि. राजू भोर, दादा बोरूडे, प्रदिप बोरुडे, बबूशा लांडे, मोहन पुजारी, शंकर गायकवाड, देवराम पोटे यांसह ग्रामस्थ आणि तरुण उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी गावातील विविध कामाची माहिती ग्रामस्थांना दिली. शैक्षणिक दर्जा उंचविण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षकांना करतानाच भविष्यात अनेक भौतिक सोयी-सुविधा देण्याचे आश्‍वासन दिले. त्याचबरोबर गावातील वाढत्या पाणीटंचाईवर चिंता व्यक्त करून भविष्यात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणावर करण्याचा मानस व्यक्त केला.