Breaking News

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली


मुंबई: अभिनेते अमिताभ बच्चन यांची चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रकृती बिघडली असल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत आमिंताभ बच्चन हे राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्ज आ ॅफ हिंदुस्थान’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विमानाने 10 डॉक्टर जोधपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. डॉक्टर तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील उपचाराबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन वास्तव्यास आहेत. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा आमिर खानचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जोधपूरमधील मेहरानगढ किल्ल्यावर सुरू होते.