औरंगाबाद : कचराकोंडीवरुन विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सभागृहात याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागले होते. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचर्याच्या गाड्या पेटवल्याने पोलिसांनी गावकर्यांच्या घरावर दगडफेक केली होती. यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस आयुक्तांवर कारवाईची मागणी उचलून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करत पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त सक्तीच्या रजेवर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:54
Rating: 5