Breaking News

एकबोटेला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी


पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेला आज शिवाजीनगर विशेष अ‍ॅट्रॉसिटी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने मिलिंद एकबोटेला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं दोन गटात हिंसाचार झाला होता. या प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर अ ॅट्रॉसिटीसह एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटेचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पुणे पोलिसांनी मिलिंद एकबोटेला राहत्या घरातून अटक केली. गुरूवारी सकाळी मिलिंद एकबोटेला 11 वाजता शिवाजीनगर विशेष अ‍ॅट्रॉसिटी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने एकबोटेला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू म्हणून न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.