Breaking News

सीबीएसई 12 वीचा पेपर फुटला


नवी दिल्ली : सीबीएसई 12 वीचा अकाउंटंसीचा पेपर फुटल्याची तक्रार आली आहे. ही तक्रार येताच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात ट्विट करताना सिसोदिया यांनी म्हटले आहे, की सीबीएसई 12 वीचा अकाउंटंसी विषयाचा पेपर फुटल्याची तक्रार मिळाली आहे. यानुसार शिक्षण संचालनालयाच्या अधिकार्‍यांना चौकशी आणि तक्रार दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी. जेनेकरून सीबीएसईच्या बेजबाबदारपणाचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही, असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.