Breaking News

ससूनच्या आधुनिकीकरणासाठी ‘सीएसआर’ महत्वपूर्ण

पुणे : ससूनसारख्या सरकारी रुग्णालयातून गरीब रुग्णांना आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निधीबरोबरच सामाजिक आणि उद्योग संस्थांच्या सीएसआरचा महत्वाचा वाटा आहे. मुकुल माधव फाउंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन ससूनमधील आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पचनसंस्थाविकार निदान व उपचार केंद्राचे (एन्डोस्कोपी युनिट) आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी सर्व सुविधांनी युक्त प्रतीक्षा कक्षाचे उद्घाटन व लोकार्पण चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले. ’मोहिनी व प्रल्हाद छा ब्रिया’ यांच्या स्मरणार्थ हे केंद्र आणि प्रतीक्षा कक्षा उभारण्यात आले आहेत. याप्रसंगी हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. फिलिप अब्राहिम, लंडन येथील रॉयल कॉलेजचे डॉ. अरविंद शहा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रितू प्रकाश छाब्रिया, प्रकाश छाब्रिया, ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. शशीकला सांगळे, डॉ. शीतल महाजन, डॉ. हरीश टाटिया, विनोद रोहानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.