Breaking News

कार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक करण्यात आलेले कार्ती चिदंबरम यांच्या जामीन अर्जाला दिल्ली उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. कार्तींना 10 लाख रुपयांची जमानत भरण्यास न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाने कार्तींना विदेशात जाण्यास मनाई केली आहे. तसेच साक्षीदारांना प्रभावित करणे किंवा कोणतेही बँक अकाउंट बंद करणे यावर बंदी घतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 15 मार्चला कार्तींना अंतरिम संरक्षण दिले. या अंतर्गत 26 मार्चपर्यंत एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ला कार्तींना अटक करता येणार नाही. माजी अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्तींच्या विरोधात मे 2017 मध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर आयएनएक्स मीडया लिमिटेडसाठी एफआयपीबीकडून चुकीच्या पद्धतीने परवानगी घेतल्याचा आरोप आहे.