Breaking News

तालुक्यातील गावांमध्ये विविध कार्यक्रमांनी अभिष्टचिंतन

कर्जत /येथील नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा वाढदिवस कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभर अनेक कार्यक्रमाचे दोन दिवसांपासून आयोजन केले जात आहे. यामध्ये वाढदिवसाच्या पूर्व संध्येला कापरेवाडी वेस येथे महिलासाठी भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय आळसुंदे, ढेरेमळा, जळकेवाडी, राजपूतमळा आदी ठिकाणच्या जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तर टाकळी येथील आश्रम शाळेत धान्यवाटप करण्यात आले. गदादेनगर, जोगेश्‍वरवाडी, गुंडनगर, भांडेवाडी, जळकेवाडी आदी ठिकाणी सत्कार करण्यात आला. सायंकाळी बाजारतळ येथे ह. भ. प. शिवलीलाताई पाटील आळंदीकर याचे कीर्तन संपन्न झाले. दि. 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजता कर्जत बसस्थानकासमोर मोफत सरबत वाटप करण्यात आले. चांदे येथे सत्कार झाल्यानंतर रायकरवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मिरजगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्कार आयोजित केला गेला, तर बाभूळगाव खालसा व माहीजळगाव चौफुला येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तर चौफुला येथे फळवाटप करण्यात आले. कोरेगाव येथील बाल आनंद मेळाव्यात अनेक मान्यवराच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. समर्थ विद्यालय, भारती पब्लिक स्कूल, संस्कार एण्टरप्रायजेस, कर्जत नगर पंचायत, म्हसोबा गेट, मेट्रो मल्टीस्टेट, विठाईनगर, अक्काबाई चौक, आंबेडकर गेट, जिल्हा परिषद शाळेजवळ अशा विविध ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला.