Breaking News

लोणी व्यंकनाथ येथील शेतकर्‍याची आत्महत्या


लोणीव्यंकनाथ येथील रहिवासी असनारे सर्जेराव भानुदास खलाटे (वय 40 वर्षे) या शेतकर्‍याने त्यांच्या राहत्त्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील रहिवासी असणारे शेतकरी सर्जेराव भानुदास खलाटे यांनी काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्त्या घराच्या पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. त्यांचे चुलत भाऊ शहाजी खलाटे यांनी दिलेल्या माहितीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.