Breaking News

लिंबाच्या दराने गाठली उच्चांकी, आजपर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक


अहमदनगर जिल्ह्यात फळबागेचा आगार समजल्या जाणार्‍या श्रीगोंदा तालूक्यात द्राश्र डांळीब बरोबरच लींबाचे विक्रमी उत्पादन होते. श्रीगोंदा तालुक्यातील बहूतांशी गावात लिंबू खरेदी केली जाते. व्यापारी लोकांच्या स्पर्धेमुळे शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे. लिंबाच्या बाजाराने गगनभरारी घेत आतापर्यंतचे रेकार्ड ब्रेक केल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक आणि लिंबू व्यापारी ऊमेश पोटे यांनी बोलताना दिली. ते यावेळी म्हणाले की, आतापर्यंत 85 रुपये किलो दराने कधीच लींबू खरेदी केले नव्हते, पंरतू यावेळी जास्त पाऊस होवूनदेखील आवक कमी होत असल्याने परराज्यातून मोठया प्रमाणात लिंबांची मागणी होत आहे. श्रीगोंदा कृषी ऊत्पन बाजार समितीत जामखेड आणि कर्जत येथूनही लिंबू येत असल्याने दररोज कोट्यवधी रुपयांची ऊलाढाल होत आहे. आंबे बाजारामध्ये येतील त्यावेळेस लिंबाचे बाजार कमी होतील अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.