Breaking News

पारनेरला महिला दिन उत्सहात साजरा


पारनेर/ प्रतिनिधी /- येथील सेनापती बापट स्मारक या ठिकाणी पारनेर नगरपंचायत व शिवसेना महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी पंचायत समिती सभापती जयश्री औटी यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाउ व क्रांती ज्याेती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. 
या प्रसंगी माजी सभापति जयश्री विजय औटी, पारनेर तहसीलदार भारती सागरे , महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरुडे, नगराध्यक्ष सिमा औटी, महीला बालकल्याण सभापती नंदा देशमाणे, नगरसेविका सूरेखा भालेकर, वैशाली औटी, पुष्पाताई साळवे, आशाताई औटी, भारती औटी व परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

जयश्री औटी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महिलांनी आता बदलत्या काळासोबत स्मार्ट होण्याची गरज आहे. पण ते करत असताना आपल्या कुटुंबाची अन सासू, सासऱ्यांची काळजी घ्यावी. एकमेकांना सहकार्य करूनच महिला प्रगत होऊ शकतात. यावेळी डॉ. पदमजा पठारे, डॉ. वर्षा पुजारी, डॉ. रजनी मुळे यांनी महीलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. स्वाती वालझाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर सिमा औटी यांनी आभार मानले.