Breaking News

वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन

कर्जत तालुक्यातील चिलवडीनजीकच्या नवलेवस्ती जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित भारावून गेले होते. सरपंच भरत नवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.



शाळेतील बालकलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांना भुरळ घातली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांच्या तालावर तरुण तसेच वयोवृद्धांनीही ठेका धरला. वेदिका शिंदे, ओंकार शिंदे, हरीओम शिंदे, नम्रता जाधव, अदिती नवले, जानवी शिंदे आदी विद्यार्थ्यांनी शौचालय बांधा घरोघरी आरोग्य नांदेल दारोदारी यावर सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधत सामाजिक संदेश दिला. कार्यक्रमासाठी चिलवडी ग्रामपंचायतचे सदस्य गोरख शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश बेद्रे, मोहन शिंदे, शिवाजी नवले, नवनाथ नवले, संतोष शिंदे, सुदर्शन शिंदे, मुख्याध्यापिका वैशाली सोनटक्के, शांतीलाल जंजिरे, कुंडलिक शिंदे, आजिनाथ शिंदे, नवनाथ दिवटे यांच्यासह परिसरातील पालक ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.