Breaking News

गौरव सौताडेची गौरवशाली कामगिरी

चला खेळूया क्रीडा स्पर्धेअंतर्गत नाशिक येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत राशिनच्या जगदंबा विद्यालयातील गौरव सौताडे याने सुवर्णपदक पटकावले. मोठ्या वजनगटातील स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील खेळल्या गेलेल्या सर्व तीन लढती गौरवने जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या या कामगिरीचे राशिन परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यालयातील क्रीडाशिक्षक दत्ता नेवसे व सचिन डमरे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने प्राचार्य दिलीप खंडागळे यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका ज्योत्स्ना जोगदंड, पर्यवेक्षक राजकुमार चौरे व हनुमंत लोंढे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शहाजी राजेभोसले, विकास मोढळे, रामकिसन साळवे, विजय मोढळे, राम कानगुडे, जालिंदर सौताडे व सर्व सेवक वृंद उपस्थित होते.