Breaking News

हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबविण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत होवून, घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभुत अधिकार मिळण्यासाठी देशात हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबविण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथील निर्माण भवन येथे गृहनिर्माण राज्यमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या स्वीय सहाय्यक अनुपकुमार यांच्याशी चर्चा केली. तर येत्या आठ दिवसात गृहनिर्माण राज्यमंत्री हरदिपसिंग यांच्या उपस्थितीत या विषयावर बैठक बोलविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेची घोषणा करुन साडे तीन वर्षे लोटली आहे. मात्र अद्यापि देशात एकही प्रकल्प उभे राहू शकलेले नाही. पैसा व जागा नसल्याने ही योजना बारगळली जात आहे. घरकुल वंचितांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हायब्रीड लॅण्ड पुलिंग हा एकमेव पर्याय राहणार असल्याचे चर्चेत अ‍ॅड.गवळी यांनी स्पष्ट केले.