Breaking News

दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास


नवी दिल्ली : पंजाबच्या पटियाला न्यायालयाने प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर मेहंदी यालादेखील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अवैध पद्धतीने लोकांना विदेशात पाठवण्याचा आरोप या दोघांवर लावण्यात आला होता. या दोन्ही भावांनी 1998 व 1999 या वर्षांमध्ये दहा लोकांना अवैधरित्या अमेरिकेत पाठवले होते. बख्शीश सिंह नावाच्या व्यक्तीने 2003 मध्ये दलेर मेहंदीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दलेर मेहंदीने 1998 व 1999 मध्ये अमेरिकेत कार्यक्रम केले. यादरम्यान आपले मदतनीस म्हणून घेऊन गेलेल्या 10 लोकांना त्याने अमेरिकेतच सोडले होते. यासाठी त्याने पैसे घेतल्याचीही माहिती आहे. एका नायिकेसोबत अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेल्या मेहंदीने मदतनीसांपैकी तीन मुलींना सॅन फ्रॅन्सिस्को येथे सोडले होते. मात्र या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मेहंदी यांनी सांगितले आहे. गेल्या 14 वर्षांपासून मी आणि माझ्या भावाविरोधात हे प्रकरण सुरु आहे. माझ्या भावाचे गेल्याच वर्षी निधन झाले. आत्ता मला जामीन मिळाला आहे. मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे असे दलेर मेहंदी यांनी सांगितले आहे.