Breaking News

मनपा ऍपवरील तक्रारीवरुन 50 हुन अधिक अतिक्रमण जमीनदोस्त

नाशिक, दि. 08 मार्च - मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल ऍपवरील ऑनलाईन तक्रारीची दखल घेत नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्यावतीने क ामठवाडे परिसरातील 50 हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली.

कामठवाडे परिसरातील विठ्ठल पार्क रो हाऊस कॉलनीतील जवळ जवळ सर्वच रो-हाऊसधारकांनी ओटे, गॅलरी, शेड उभारले होते. त्यामुळे अंतगर्त रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या संदर्भात आयुक्तांच्या आदेशाने तयार करण्यात आलेल्या ऍपवर तक्रार नोंदविण्यात आली होती.
या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात येऊन सदर अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा विभागीय अधिकारी डॉ.सुनिता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अतिक्रमण अधिकारी अंकूश आंबेकर यांच्यासह मनपाचे 36 अधिकारी व कर्मचारी, दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.