मोर्चासंदर्भात निभेंरे येथे बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. १९ रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात राहुरी तालुक्यातील निभेंरे येथे एक महत्वपूर्ण बैठकपार पडली. पं. स.चे माजी सभापती भिमराज हारदे, निंभेरेचे माजी सरपंच विष्णू सिनारे, चांगदेव हारदे, सूर्यभान हारदे, बबन सिनारे, ज्ञानदेव साबळे, बाळकृष्ण हारदे, अनिल हारदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी होण्याचे निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे आणि उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी आवाहन केले.