पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर आ. बाळा भेगडे यांची नियुक्ती
पुणे, दि. 03, मार्च - महाराष्ट्र विधानसभेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानसभेचे प्रतिनिधी मावळचे आमदार आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृष्ण भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, रामदास काकडे तसेच सर्व संस्था सदस्यांनी आमदार भेगडे यांचे अभिनंदन केले.
’गेली अनेक वर्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बहुमूल्य शैक्षणिक योगदानाची पार्श्वभूमी असल्याने आगामी काळात मोठे कार्य करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे,’ असे मत कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केले.’महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने ही जबाबदारी महत्वपूर्ण आहे,’ असे आमदार बाळा भेगडे म्हणाले.