Breaking News

भिडेच्या अटकेसाठी विधानपरिषदेत गदारोळ स्थगन प्रस्ताव सभापतींनी नाकरला

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेतील आरोपी म्हणून ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्या संभाजी भिडे यांना अटक का केली जात नाही? भिडे यांना कोण वाचवत आहे? असा सवाल करत विधानपरिषदेत विरोधीपक्षांकडून 289 अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर चर्चा व्हावी, असा आग्रह धरला गेला. परंतु, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तो प्रस्ताव नाकारल्याने विधानपरिषदेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. यामुळे सभापतींनी विधानपरिषदेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले.


राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, जयदेव गायकवाड, जोगेंद्र कवाडे यांनी नियम 289 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर सभापतींनी हा विषय कामकाजात नसल्याचे सांगत तो नाकारला. त्यामुळे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, यांच्यासह राष्ट्रवादीचे विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमरसिंग पंडित, यांच्यासह आमदार विद्या चव्हाण, जयदेव गायक वाड, जोगेंद्र कवाडे यांनी हौद्यामध्ये जाऊन संभाजी भिडे आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. यानंतर मात्र, दलित समाजातील आमदार जोगेंद्र कवाडे, जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, यांच्यासह विद्या चव्हाण याही क ाहीवेळ सभागृहात गायब राहिल्याने भिडे यांच्या अटकेच्या चर्चेचा विषय तहकूबीनंतर सभागृह सुरू झाल्यास सभागृहात उपस्थित झाला नाही. यामुळे सभापतींनी पुढील कामकाज पुकारले.