Breaking News

पाकिस्तान दहशतवादाचा मुख्य स्त्रोत संयुक्त राष्ट्रामध्ये पाकला भारताने सुनावले


जिनेव्हा/वृत्तसंस्था : दहशतवादाच्या मुद्याहून भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले असून, पाकिस्तान हा जगातील दहशतवादाचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला उत्तर देताना ‘राइट टु रिप्लाय’ अंतर्गत भारताने युनोत आपले म्हणणे मांडले. यावेळी भारताने म्हटले आहे, की ‘पाकिस्तानने पुन्हा एकदा प रिषदेच्या मौल्यवान वेळेचा वापर भारतावर आरोप करण्यासाठी केला, ही खेदाची गोष्ट आहे. मुळात पाकिस्तानचेच मानवाधिकारासंबंधीचे रेकॉर्ड निंदनीय आहे. एवढेच नाही, तर दहशतवादाच्या मुख्य स्त्रोताच्या रुपातीली त्यांचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. भारताने यावेळी बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा आणि सिंध प्रांतात पाकिस्तानी सैन्यांकडून होत असलेल्या सामान्य नागरिकांवरील अत्याचाराचा मुद्दाही उपस्थित केला. येथील लोकांचे नेहमीच अपहरण होते आणि ते मारले जातात. सध्या होत असलेल्या आणि पूर्वी पाकि स्तानी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षामुळे उत्तरपश्‍चिम पाकिस्तानातून 10 लाखहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. येथील अल्पसंख्यक समाजाच्या महिला आणि मुलींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने लग्न लावली जातात, असेही भारताने म्हटले आहे.