Breaking News

विमा संरक्षणामुळे कुटूंबाला उभे राहण्याची उमेद मिळेल


नगर - हमाल-मापाडी यांच्या विकासासाठी हमाल पंचायतीच्यावतीने श्रमिक बाजार, पतसंस्था, हॉस्पिटल आदिंच्या माध्यमातून हमाल-मापाड्यांचे सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक प्रश्न सोडविले आहे. हमाल पंचायतचेअध्यक्ष अविनाश घुले यांच्या कार्यतत्परतेमुळे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. हमाल-मापडी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचविण्याबरोबर त्यांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे.गेलेल्या माणसाचे दु:ख हेसर्वांसाठी मोठे असते, परंतु त्यानंतर त्याच्या कुटूंबाला विम्याच्या माध्यमातून आधार मिळतो, त्यातून त्या कुटूंबाला उभे राहण्याची उमेद मिळते असे प्रतिपादन हमाल माथाडी पतसंस्थेचे चेअरमन बबनराव आजबे यांनीकेले.