Breaking News

‘अमृतवाहिनी’च्या प्रोजेक्टला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक


गुणवत्तापूर्वक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. तंत्रनिकेतनच्या सिव्हील विभागातील ‘कि ऑफ स्मार्ट बिल्डिंग’ या प्रोजेक्टला पुणे येथील झिल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड रिसर्च इंस्टिट्यूटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेत ‘अ‍ॅटोमॅटीक कचरा सिस्टीम’ या प्रोजेक्टला बेल्हे येथील समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट अ‍ॅण्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे, अशी माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. व्ही. बी धुमाळ यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी १९८३ साली अमृतवाहिनी तंत्रनिकेतनची स्थापना केली. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने राज्यात लौकिक मिळविला आहे. अमृतवाहिनी तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नेहमी विविध उपक्रम राबविते. अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या सिव्हील विभागातील ‘कि ऑफ स्मार्ट बिल्डिंग’ प्रोजेक्ट सुवासी कृष्णा गुप्ता प्रियंका बाळासाहेब गायकवाड, श्रेया बाळासाहेब कांडेकर, विशाल रोहीदास खतोडे, वैभव बाळासाहेब मुटकुळे तसेच ‘अ‍ॅटोमॅटीक कचरा सिस्टीम’ हा प्रोजेक्ट तृतीय वर्षे सिव्हील विभागातील विद्यार्थी राहूल संजय आवारे, प्रेम अरुण वाळवे, किरण भागा सांगळे, श्रीकांत अशोक कानवडे यांनी तयार केला. या विद्यार्थ्यांना प्रा. सातपुते, प्रा. आभाळे, प्रा. राजेभोसले तसेच प्राचार्य प्रा. व्ही. बी धुमाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्‍वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्‍वस्त शरयु देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.