Breaking News

मुलीच्या लग्नाविषयीच्या चिंतेमुळे शेतकर्‍याची आत्महत्या


जालना - सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणात मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेने शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रंजित देविदास पडघन असे शेतकर्‍याचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. पडघण यांच्यावर स्टेट बॅक ऑफ इंडिया बँकेचे कर्ज आहे. मुलीच्या लग्नाच्या चिंतेत ते होते, असे त्यांची पत्नी मणकर्णा पडघण यांनी सांगितले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.