औरंगाबाद-बीड महामार्गावरील दरोड्यात एकाचा मृत्यू
औरंगाबाद, दि. 15, मार्च - औरंगाबाद-बीड महामार्गावर अज्ञात दरोडेखोरांनी चारचाकी चालकाला थांबवून लूटल्याची घटना घडली आहे. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.गाडीवर दगड का मारला असे विचारत दरोडेखोरांनी चारचाकी चालकाला गाडी थांबवयाला लावले. त्यानंतर या संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी चारचाकीतून मोठ्या रकमेची लूट केली असल्याचे सांगण्यात येत आहे.