Breaking News

आत्महत्या करणा-या पोलीसाचा उपचारादरम्यान मृत्यू


लग्नास जबरदस्ती केल्यामुळे स्वतःला जाळून घेत आत्महत्या करणा-या पोलीस कर्मचार्‍याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल घुले असे या पोलीस क र्मचार्‍याचे नाव आहे. शहरातील मयूर पार्कमधील पार्वतीनगरमध्ये अनिल याने दोन दिवसांपूर्वी स्वतःला जाळून घेतले होते. त्याच्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
अनिल हा शहर पोलीस दलातील चार्ली पथकात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. भोकरदनमधील गायकवाड यांच्या मुलीशी काही दिवसांपूर्वी अनिलचे लग्न जुळले होते. यानंतर दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम होऊन 1 एप्रिल रोजी विवाहाची तारीख निश्‍चित करण्यात आली होती. परंतु अनिलचे आणि मुलीचे काही कारणास्तव बिनसले होते. यानंतर अनिलने मुलीच्या घरच्यांना व स्वतःच्या आईला लग्न करणार नसल्याचे सांगितले होते.
परंतु मुलीच्या घरच्यांनी अनिलच्या निर्णयाला विरोध करत साखरपुड्याचा झालेला खर्च म्हणून 25 लाख रुपये देण्याचे सांगितले. अनिल आणि त्याच्या घरच्यांसाठी ही रक्कम देणे शक्य नव्हते. त्यामुळे तणावाखाली येत अनिलने दोन दिवसांपूर्वी अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेतले.