Breaking News

बीड नगर पालीकेचा अर्थसंकल्प सादर

बीड (प्रतिनिधी)- ‘ना दर वाढ ना कर वाढ’ असा सर्व सामान्य नागरीकांना डोळ्यासमोर 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. एकूण 283 कोटी 94 लक्ष 28 हजार 657 रूपयांचा अर्थ संकल्प बीड नगर पालिकेत सादर करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत एकूण 197 कोटी रूपयाने वाढ झाली असून सामान्य नागरीकांवर विना बोजा यंदाचा अर्थसंक ल्प सादर केला आहे. यासाठी आ. जयदत्त क्षीरसागर व पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभले असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आयोजिल पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मंचावर नगरसेवक विनोद मुळूक, विकास जोगदंड, गुरखुदे आदींची उपस्थिती होती.



याप्रसंगी बोलताना डॉ. क्षीरसागर म्हणाले की, बीड शहर विकासाच्या दुष्टीने अर्थसंकल्प सादर केला आहे. शासनाच्या विविध योजना खेचून आणण्यामध्य बीड नगर पा लिका यशस्वी ठरलेली आहे. येणाजया वर्षात हरित योजने अंतर्गत उद्यान करण्याचे उदिष्ठ आहे. यासाठी 2 कोटी 94 लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. याशिवाय अमु्रत अटल योजने अतर्ंगत पाणी पुरवठा योजनेसाठी 114 कोटी व भुयारी गटार योजनेसाठी 138 कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. राज्यातील शहर विकासाच्या योजनां बीडसाठी खेचून आणण्याचे काम आ. जयदत्त क्षीरसागर यांच्याा माध्यमातून करत आहोत. यामुळे ना दर वाढ ना कर वाढ याप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्प सादर करू शकलो. असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.
स्वच्छतेसाठी सरसावले नगराध्यक्षासह नगरसेवक बीड शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीमेला गती देण्याच्या उद्देशाने बीड पालिकेने ऍप तयार केले आहे. जर नगरसेवकांना अथवा नागरीकांना आपल्या प्रभागात अस्वच्छता अथवा काही अडचणी असतील तर ऍपवर टाकण्याची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे, ज्या त्या प्रभागाची जबाबदारी नगरसेवकांवर दिलेली आहे. त्यानुसार तत्काळ स्वच्छता अथवा इतर काम मार्गी लावले जाईल असे नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. महिला बचत गटांना बळकटी देण्याच्या उद्देशाने बीड पालिका वेगवेगळ्या योजना सातत्याने राबवत आहे. गत आठवड्यात 130 महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले. 
शिवाय महिलांसाठी शौचालय उभारणीचे काम येणाजया काळात बीड पालिका हाती घेत असून शहरातील सर्व मुख्यरस्त्याचे रूंदीकरण व विकास करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला असून मंजूरीच्या टप्यावर असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यापूर्वी ऑफलाईन बांधकाम परवान्यामुळे नागरीकांना पालिकेत खेटे मारावे लागत होते. मात्र आता ऑनलाईन बांधकाम परवाना नागरीकांना मिळणार असल्याने पालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ झाली असून ही बाब नागर पालिकेसाठी जमेची असल्याचे पत्रकार परिरषदेत सांगण्यात आले.
बीड नगर पालिकेत मी अनेक वर्षापासून काम करत आहे. यापूर्वी अनेक विरोधक होते. नगर पालिकेच्या सभागृहात वेगवेगळ्या विषयांवर विरोध व्हायचा, मात्र विक ासाच्या मुद्दयावर विरोधक देखील सत्ताधाजयांना सहकार्य करायचे. मात्र आता मागील दहा महिन्यांपासून बीड नगर पालिकेत केवळ विरोध करायचा म्हणून विरोध केला जातोय. यामुळे शहरातील विकास कामांना खिळ बसते आहे. माध्यमांमधून बातम्या छापून आणायच्या कृती मात्र शुन्य अशी परिस्थिती बीड नगर पालिकेत उदभवलेली आहे. ही बाब बीड शहराच्या विकासासाठी धोक्याची आहे, अशी खंत यावेळी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केली. चुकीची कामे होणार असतील किंवा कोणी करणार असतील तर मी क ोणाचीही नाराजी पत्कारायला तयार आहे.