Breaking News

माजी विद्यार्थ्यांच्या ‘प्रवरा परिवार’ मेळाव्यांचे एकत्रित आयोजन : निमसे


प्रवरानगर प्रतिनिधी - प्रवरेच्या वतीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभिमत विद्यापीठ आणि विखे पाटील फौंडेशनच्यावतीन‘प्रवरा परिवार’ या संकल्पनेतून माजी विद्यार्थ्यांचे मेळावे एकत्रितपणे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण संस्थचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे यांनी दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० रोजी विळदघाट {अहमदनगर} येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथे पहिला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यानंतर ३० मार्च २०१८ रोजी लोणावळा येथे आणि ७ एप्रिल २०१८ रोजी दिल्ली येथे असे तीन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. 

यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संशोधन, अनुदान व प्रकल्प संचालिका डॉ. प्रिया राव, विखे पाटील फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी लेफ्ट. जनरल बी. सदानंदा, कल्हापुरे आदी उपस्थित होते.