Breaking News

हमीभावात शेतकर्‍यांच्या श्रमाचा विचार ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिकांच्या किमान आधारभूत किमतीबाबत ‘मन की बात’ मधून महत्वपूर्ण घोषणा केली आहे. शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देताना शेतकर्‍यांच्या श्रम मूल्याचा त्यात विचार केला जाईल, असे पंतप्रधानी म्हटले आहे. ‘मन की बात’ या संवाद कार्यक्रमाचा 42 वा भाग आज प्रसिध्द होत आहे. ज्यातून पंतप्रधान विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधत आहे. पिकांची आधारभूत किंमत ठरवताना जनावरे किंवा मशीनवरील खर्च, बियाणे, सिंचन, मजूर या सर्वांवर केल्या जाणार्‍या खर्चाचा तसेच शेतकर्‍याच्या श्रममूल्याचा विचार एकत्रितपणे विचार केला जाणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीमुळे सिंचन, बंदरनिर्मिती क्षेत्रात विकास करता आला. 1940 ला जग दुसर्‍या महायुध्दावर चर्चा करत असताना, डॉ. आंबेडकर एकमेव असे नेते होते जे अखंडत्व, भारताच्या संघवादाची मांडणी करत होते अशा शब्दांत पंतप्रधानांनी गौरव केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीला विधायक व ृत्तीने झटणार्‍या नागरिकांचा उल्लेख केला. उत्तर प्रदेशातील एका महिलेने 125 शौचालयांची निर्मिती केली. कानपूरचे डॉक्टर अजित चौधरी हे रूग्णांना मोफत उपचार आणि औषधांचे वाटप करत आहेत. तर आसामच्या करीमगंज येथे राहणारा सामान्य रिक्षाचालक शालेय विद्यार्थ्यांची मोफत वाहतूक करतो हे सर्व देशासाठी प्रेरणेचे स्त्रोत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारने हामीभावासंदर्भात जो निर्णय घेतला आहे. त्यात शेतमजूरांना दिला जाणारा मोबदला, पशुधन, उपकरणांवर झालेला खर्च, बियाणे खरेदीची किंमत, खतं, सिंचनावरील खर्च, जमिनीचा मोबदला आणि त्यावरील व्याज, जर एखाद्याने जमीन भाडेतत्वावर घेतली असली तर त्याचं भाडं आणि शेतकर्‍याच्या कुटुंबाचे कष्ट यासर्वांचे मुल्यमापन करुन हामीभाव ठरवला जाईल. पंतप्रधान पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी यासाठी, देशात अ‍ॅग्रीकल्चर मार्केटिंग रिफॉर्मवरही सरकार काम करत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण 
दरम्यान, त्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मरण करुन, ‘ग्राम स्वराज अभियाना’ची घोषणा केली. 14 एप्रिल ते 5 मेपर्यंत हे अभियान देशात राबवलं जाणार असून, याअंतर्गत ग्रामविकास, गरिबी कल्याण आणि सामाजिक न्याय आदी विषयांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असं सांगून देशातील सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. तसेच डॉ. बाबासाहेबांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या व्हिजनवर काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकाळात औद्योगिकीकरणाची संकल्पना मांडली होती. उद्योगांचा विकास शहरातच होणं शक्य असल्याने, त्यांचा शहरीकरणावर विश्‍वास होता.