पशुसंवर्धनसाठी निधी आणणार : रोहमारे
त्या म्हणाल्या, पशुसंवर्धन समिती मिळाली, याचा विशेष आनंद होत आहे. यामुळे मुक्या जनावरांची सेवा करता येते, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. शेतक-यांच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेले युवानेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन समितीच्यामाध्यमातून विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले. शेतक-यांना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा व संकरीत वासरांचा मेळावा आयोजित केला. जिल्हा परिषदेच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा.
याप्रसंगी सोनाली रोहमारे यांच्या हस्ते पशूपालकांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षिसे व औषधे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. जामदार यांनी जनावरांची योग निवड कशी करावी, जनावरांची काळजी कशाप्रकारे घ्यावी, लसीकरण, आहार, स्टँडर्ड सायटेड कृत्रिम रेतन, रेबीज, जनावरांना होणारे विविध आजार, वंध्यत्व निवारण व औषध उपचार, चारा सकसीकरण, खत व्यवस्थापन याबाबत पशू पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहणे, जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात, बाबासाहेब नेहे, राहुल रोहमारे, पोलीस पाटील मैड, डॉ. दहे, डॉ. जामदार, डॉ. घोरपडे, अशोक नेहे आदींसह पशूपालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.