भामट्यांनी दुकानातून २२ हजार लांबविले
आश्वी बुद्रुक येथे आठवडे बाजार असल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वर्दळ व गर्दी होती. या बाजारपेठेत नेमीचंद भंडारी यांचे दुकान आहे. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास भंडारी यांच्या पत्नी दुकानामध्ये एकट्या होत्या. याचवेळी दुचाकी वरुन आलेल्या तीन भामट्यानी नेमीचंद भंडारी यांच्या दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्याचा बहाण्याने प्रवेश केला. यावेळी या तीन भामट्यानी दुकानात असलेल्या पैशाचा गल्ला व त्यातील रक्कमेचा अंदाज घेतला. तर याचवेळी भंडारी यांच्या पत्नीला बोलण्यात गुंतवत २२ हजार रुपयांची लंपास केली. नेमीचंद भंडारी यांचा मुलगा अमित भंडारी यांच्या हा प्रकार लक्षात आला. आले. त्यामुळे त्यांनी बुधवारी {दि. २० } सकाळी दहाच्या सुमारास आश्वी पोलीस स्टेशनयामध्ये तक्रार दिली.