२४ रोजी दिव्यांगांचा मेळावा
कोपरगाव प्रतिनिधी - माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या अपंग सेलच्यावतीने दिव्यांगांसाठी युनिक डिसअॅबिलीटी स्वावलंबन कार्ड योजनेचा शुभारंभ व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील गुरूद्वारा रस्त्यालगतच्या भाजपा संपर्क कार्यालयात दि. २४ रोजी सकाळी अकरा वाजता आ. स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मेळाव्याला दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, दिव्यांग भाजपा तालुकाध्यक्ष मुकूंद काळे आदींनी केले आहे.