बालमृत्यु रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय - पंकजा मुंडे
मुंबई - बालमृत्यु रोखण्यासाठी आदसेच बिगर आदिवासी जिल्ह्यात बाल आरोग्य केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून विविध योजना राबवून बालकांना पोषण आहार देण्यात येत आहे, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांसंदर्भातील लक्षवेधी सूचना सदस्य रविंद्र फाटक यांनी मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुंडे म्हणाल्या, बालमृत्युसाठी केवळ कुपोषण हे कारण नसून त्यामध्ये अनेक कारणे आहेत. बालमृत्यु होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत शासन संवेदनशील आहे. बालमृत्यु कमी करण्यासाठी बाल आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सर्व अंगणवाडी सेविकांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन नियमित देण्यात येत आहे, असेही विचारलेल्या एक उपप्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी यावेळी सांगितले.