वाहतूक कोंडीवर दोन दिवसात अंतिम आराखडा पाहिजे- ठाणे आयुक्त
ठाणे - ठाणे शहरातील वाहतूक कोंडरण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या 30 मार्चपर्यंत नागरिकांसाठी सुरू होतील अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन क रण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज सर्व संबंधित अधिका-यांना दिले. दरम्यान कोपरी पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून या ठिकाणी होणारी वाहतूक क ोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता आणिपर्यायी वाहतूकीचा अंतीम आराखडा दोन दिवसात सादर करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी यावेळी दिले.
महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी आज सकाळपासून विविध विकास कामांची पाच तास पाहणी करून अधिका-यांशी, नागरिकांशी चर्चा केली. यावेळी जयस्वाल यांनी खोपट येथील थांबलेल्या रस्त्याच्याकामाची पाहणी करून केवळ पुनर्वसनामुळे रस्त्याचे काम थांबले असेल तर रस्त्यात बाधित होणा-या नागरिकांचे बीएसयुपी किंवा रेंटल हाऊसिंगमध्ये त्यांचे पुर्वसन करून रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचे रूंदीकरण करता येऊ शकेल काय याची चाचपणी करण्याच्या सूचना देवून या रस्त्याचा प्लेन टेबल सर्वे क रण्यासंबंधी त्यांनी संबंधित अधिका-यांना सांगितले. या भेटीत जयस्वाल यांनी जोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन करून जोगिला तलाव पुनरूज्जीवन करण्याबाबत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नागरिकांशीसंवाद साधून तुम्हाला बेघर करणार नाही असा शब्द दिला.
दरम्यान, शहरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करून अल्मेडा चौक येथील उड्डाण पुल 15 एप्रिल, मल्हार सिनेमा जवळील पूल 15 मे आणि कॅसल मिल येथील उड्डाण पूल 30 मे अखेर सुरू होईल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर मनोरूग्णालय आणि मॉडेला मिल या ठिकाणी रस्ते आणि पार्किंग सुविधा कशा निर्माण करता येतील याची चाचपणी करण्याविषयीही त्यांनी अधिका-यांशी चर्चा केली.