Breaking News

फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून पाच लाखांना गंडा


कल्याण, दि. 07, मार्च - फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका इसमाला पाच लाखांना गंडा घातल्याची घटना कल्याणात उजेडात आली आहे. सुनील हसे असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून ते भायखळा येथे राहतात. दोन वर्षा पूर्वी कल्याणमध्ये राहणारा शशिकांत शेलार याने हसे यांना आधारवाडी योगेश्‍वर अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रुपये चेक द्वारे घेतले. मात्र दोन वर्ष लोटूनही फ्लॅट न मिळाल्याने हसे यांनी शेलारला जाब विचारला त्यामुळे संतापेल्या शेलारने त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हसे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी शेलार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.