Breaking News

उसाटणे - बदलापूर रस्त्याच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार


डोंबिवली, दि. 07, मार्च - उसाटणे - बदलापूर रस्त्याच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. कल्याण शिळ रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या रस्त्याला पर्याय म्हणून तळोजा एम. आय.डी.सी. उसाटणे - बदलापूर पाइपलाईन रस्त्याची झालेली दुरावस्था शिवसेनेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीचे आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्या निदर्शनाला आणली. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला मदान यांनी परवानगी दिली असून या कामाचा प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना सादर क रण्यात आला. मंजुरी मिळताच सदर कामाला सुरुवात करण्याचे आश्‍वासन आयुक्त मदान यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे याना दिले. या रस्त्याच्या कामासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत होते. त्याचप्रमाणे शहाड जंक्शन येथील सुमारे 300 कोटी रुपयांचे कामही सुरु करण्यात येणार आहे.
खा. डॉ. श्रीकात शिंदे यांनी एका बैठकी निमित्त एम.एम.आर.डी.चे आयुक्त यु.पी.एस. मदान यांची भेट घेतली. त्या वेळी त्यानी कल्याण शिळ रस्त्याला पर्याय असलेल्या तळोजा उसाटणे - बदलापूर पाईपलाईन रोडच्या दुर्दशेकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे निदर्शनाला आणले. मदान यांची मंजुरी मिळताच कामाला प्रारंभ करण्याची ग्वाही दिली. कल्याण शिळ व तळोजा शिळ रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून अवजड वाहनांची मोठया प्रमाणावर वाहतूक होत असल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्याला पर्याय असलेल्या या मार्गाचा वापरही मोठया प्रमाणावर होत असतो याकडे लक्ष वेधले. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून खा. शिंदे सतत पाठपुरावा करत होते. तसेच त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांही पत्र पाठवून मागणी केली होती.