Breaking News

कन्या विद्यालयात महिला दिन साजरा


महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे यायला हवे, असे प्रतिपादन  जामखेड नगर परिषद अध्यक्षा अर्चना राळेभात यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त येथील कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जामखेड नगर परिषद अध्यक्षा अर्चना राळेभात बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, नगर सेविका विद्या वाव्हळ, जयश्री पवार, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यपिका एम. एस. मेढे, पर्यवेक्षक डी. आर.ढवळे, क्रीडाशिक्षक बी. के. मडके, संतोष सरसमकर यांची यावेळी भाषणे झाली. महिला दिनानिमित्त शाळेतील वैद्यार्थिनींचे भाषणे झाली.
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलींनी स्वसंरक्षणार्थ तायक्वांदो प्रशिक्षण घेतले पाहिजे, म्हणून जीन सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कन्या शाळेतील सर्व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.