Breaking News

परिवाराचे सदस्यांच्या सूचनांचे नेहमीच स्वागत : कोल्हे


कोपरगांव : प्रतिनिधी - ‘संजीवनी’ कर्तव्यभावनेतून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. संजीवनीच्या वैभवात शिक्षकांचे योगदान मोठे आहे. विद्यार्थ्यांनि नेहमी शिक्षकांच्या पुढे जावे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटेल. डोळे उघडे ठेऊन संधींचे सोने केले. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन हे सर्व घटक मिळून संजीवनी परिवार आहे. परिवाराचे सदस्य या नात्याने सूचनांचे नेहमीच स्वागत आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी केले.

संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकने वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा ‘संजीवनी तंत्र उद्योजक ’ पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्राचार्य ए. आर. मिरीकर, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. सुधाकर शेळके, माजी विद्यार्थी प्रतिनिधी प्रसिध्द उद्योजक व पुणे येथील सूर्या ग्रुपचे चेअरमन योगेश वाके, नाशिकचे मिलींद तारे आदी उपस्थित होते. या उद्योजक मेळाव्यासाठी अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांमधून सुमारे १०० यशस्वी उद्योजकांनी हजेरी लावून जुन्या आठवनींना उजाळा दिला. 

प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्वांचे स्वागत करून पाॅलिटेक्निकच्या विविध उपलब्धींबाबत माहीती दिली. अमित कोल्हे म्हणाले, संस्थेच्या स्थापनेस सुमारे ३४ वर्षे झाली. काळानुसार अनेक आमूलाग्र बदल झाले. आजही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे मार्गदर्शन करतात. कालपरत्वे विध्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी परदेशी शिक्षकांची येथे नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत स्पॅनिश, जापनीज, जर्मन, चायनीज व इंग्रजी आदी भाषा विनामूल्य शिकविल्या जातात. यावेळी ग्रुप सुर्याचे चेअरमन योगेश वाके, उद्योजक मिलिंद तारे, सचिन ढूस, नितीन शिंदे, केशव भवर, सिध्दार्थ वानखेडकर आदींची प्रा. योगेश जगताप यांनी सूत्रसंचालन कले. प्रा. शेळके यांनी आभार मानले.