Breaking News

वरखेडे-लोंढे प्रकल्पाला 526 कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता

जळगाव, दि. 10, मार्च - उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणा-या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी वित्त विभागाकडून 526.64 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती. 9 मार्च शासनाने अधिकृतरित्या शासन निर्णय जाहीर केल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.


जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत व्यय-अग्रक्रम समितीची बैठक झाली. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रक ल्पासाठी दुसर्‍या टप्प्यातील 526.64 कोटीची महत्त्वाची सुधारित मान्यता देण्यात आली. बैठकीला आ.उन्मेष पाटील हे देखील उपस्थित होते. या प्रकल्पास केंद्र शासनाच्या बळीराजा संजीवनी योजनेतून निधी मिळवून जून 2019 पर्यंत या प्रकल्पात पाणीसाठा करण्याचे शासनाचे नियोजन आहे, अशी माहिती माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.