Breaking News

कॅम्पस मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांना कंपन्यामध्ये नोकरी


तालुक्यातील कोळपेवाडी येथील रयत संकुलातील श्री. छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजमध्ये एच. एस. सी. व्होकेशनल विभागातर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये ३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांनी नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य एन. ए. मते यांनी दिली.

गेल्या बुधवारी {दि. ७.} या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी औरंगाबाद येथील देवगिरी फोर्जिंग, धूत एंटरप्राइजेस, श्रेय केमिकल्स, एस. एस. कंट्रोल, पुणे येथील कल्याणी फोर्ज या कंपनीसह औरंगाबादच्या स्काय प्लेसमेंट प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या मुलाखतीमध्ये श्री. छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजच्या एच. एस. सी. व्होकेशनल विभागाकडील ३७ विद्यार्थी तसेच सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या ६४ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांनी नोकरीमध्ये सामावून घेतले.

दरम्यान, नोकरीसाठी निवड करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माजी आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य एन. ए., मते प्राचार्या डॉ. विजया गुरसळ आदींनी अभिनंदन केले आहे. मुलाखती यशस्वी करण्यासाठी व्होकेशनल विभागाकडील शिक्षकवृंद अविनाश शिंदे, अप्पासाहेब आगवन, महामिने, दूधलमल, प्रा. मैद , प्रा. कोकाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.