Breaking News

शिर्डीच्या बसस्थानकावर आढळली बेवारस बॅग!


शिर्डी बसस्थानकावर एक बेवारस व्ही. आय. पी. बॅग बेवारस असल्याची माहिती स्थानकप्रमुख ठकाजी जगताप यांनी दिली. त्यामुळे काही वेळ बसस्थानक परिसरात घबराट पसरली होती. दरम्यान, नगर येथील कुरिअर स्फोस्पोटानंतर शिर्डी शहरातही बॉम्ब शोधक पथक दक्ष झाले आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी तपासणी करण्यात आला, अशी आल्याची माहिती शिर्डी येथील बॉम्ब शोधक पथकाचे प्रमुख स. पो. नि. विकास घनवट यांनी दिली. 

शनिवारी {दि. २४} सायंकाळी ५ च्या दरम्यान रामनवमीनिमित्त मोठ्या प्रमाणावर साईभक्त आले होते. यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष अवघ्या पाचच मिनिटात लावण्यात आला. श्वान वर्धन आणि बॉम्बशोधक पथकाने बसस्थानकावर जाऊन पाहणी केली. यामुळे अफवा पसरून घबराट निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत तपासणी करण्यात आली. अधिक माहिती देताना स. पो. नि. घनवट म्हणाले, बॅगची तपासणी केली असून त्यात स्त्री व पुरुष यांचे कपडे व महिलेचे छोटे पाकिट मिळून आले. त्यात ३ हजार रु. रोख रक्कम मिळून आली. संपूर्ण तपासणी केल्यानंतर याची चौकशी केली. 

ही बॅग लखनउ येथील साईभक्ताची होती. दोन दिवसाचा प्रवास, झालेली धावपळ यात नाशिक येथून रेल्वेचे सायंकाळचे बुकिंग असल्याने महिलेकडून नजरचुकीने सदर बॅग बसस्थानकावर राहिल्याने यावर पडदा पडला. अखेर चौकशी केल्यानंतर संबंधिताच्या शिर्डी येथील नातेवाइकांच्या ताब्यात ही बॅग देण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत महमद शेख, संदीप पाठक, शाम गुजर, सतीश कुटे यांनी भाग घेतला.