टाकळी ढोकेश्वर येथे शालेय साहित्य वाटप; सुजित झावरेंचा वाढदिवस उत्साहात
तालुक्याचे नेते माजी जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील देवकृपा प्रतिष्ठान व सुजित झावरे मित्रमंडळाच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा टाकळी ढोकेश्वर येथे चिमुकल्यांना पर्यावरणपूरक २०० चपलांचे वाटप तसेच शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन अरुण ठाणगे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिलारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे, संचालक राजेश भंडारी, पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील खेडकर, उपाध्यक्ष किसन धुमाळ, भागुजी झावरे, महादू भालेकर, गंगाधर बांडे, पंडितराव झावरे, इंजिनिअर प्रसाद झावरे, अशोक पाटोळे, रावसाहेब कावरे, मुख्याध्यापक अशोक रोकडे, अमोल साळवे, बंडू रांधवन, राजेंद्र काकडे, दादा झावरे, सद्दाम इनामदार, केंद्रप्रमुख रमेश फापाळे आदींसह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.