Breaking News

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जणांची बिनविरोध निवड


मुंबई - महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी सहा उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.यात केतकर कुमार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), चव्हाण वंदना (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), जावडेकर प्रकाश (भारतीय जनता पार्टी), देसाई अनिल (शिवसेना), राणे नारायण (भारतीय जनता पार्टी), व्ही. मुरलीधरन (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे, असे महाराष्ट्र विधीमंडळाचे उपसचिव तथा द्विवार्षिक निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. सहा जागांसाठी आधी एकूण सात अर्ज भरण्यात आले होते. मात्र भाजपच्या वतीने विजया रहाटकर यांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरित सहा जणांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.