Breaking News

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वेदांकडे वळणे आवश्यक : पंतप्रधान


नवी दिल्ली : हवामान बदलाच्या संकटांचा सामना करायचा असेल तर वेदांकडे वळावे लागेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते इंटरनॅशनल सोलर अलायंस संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी मोदी म्हणाले, की, ‘भारतात वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच सूर्याला विश्‍वाचा आत्मा मानले आहे. भारतात सुर्याला पोषणकर्ता मानले जाते. आज आम्ही हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मार्ग शोधत आहोत, अशा परिस्थितीत आपला प्राचीन काळातील दृष्टिकोन काय होता, त्याकडे बघावे लागेल. याप्रश्‍नावर आपण एकत्रितपणे काय करू शकतो, यावर आपले उज्वल भविष्य अवलंबून आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, आपण कशाप्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवू शकतो यावर काही उपायही सुचवले. ते म्हणाले, सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, तंत्रज्ञान आणि विकासाची उपलब्धता, आर्थिक संसाधने, किमतीत घट, स्टोरेज तंत्रज्ञानाचा विकास, अधिक उत्पादन होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यान्युएल मैक्रॉन हे, राष्ट्रपती भवनाता आयोजीत करण्यात आलेल्या या आयएसएच्या स्थापना संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेसह 23 देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि 10 देशांच्या मंत्र्यांसह 121 देशांचे प्रतिनिधि सहभाग घेणार आहेत. यात आंतरराष्ट्रीय सोलर अलायंसशी संबधित 121 देशांमध्ये सौर ऊर्जेला प्रोत्साहनदेण्यासठी विविध स्थरांवर चर्चा केली जाणार आहे. या संमेलनात सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक तंत्र, क्राउड फंडिंगवर चर्चा केली जाणार आहे.