Breaking News

राफेल खरेदीच्या करारात तिपटीने वाढ

नवी दिल्ली : गोपनीयतेचे कारण देत सरकार राफेल ज्या लढाऊ विमानांची किंमत लपवत होतं त्या विमानाची किंमत अखेर उघड झाली असून, राफेल विमानांची निर्मिती करणार्‍या डासू कंपनीनेच आपल्या वार्षिक अहवालात भारताला राफेल विमान प्रत्येकी 1670.70 कोटी रुपये प्रत्येकी या किमतीने विकल्याचे म्हटले आहे. मागील दोन महिन्यात राफेल विमान घोटाळ्याचा आरोप करत काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी डासू एव्हिएशन कंपनीच्या वार्षिक अहवालाची एक प्रतच जाहीर केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांनी आरोप केला आहे की राफेल विमान खरेदीचा जो करार 2012 मध्ये एका विमानासाठी 526.1 कोटी रुपयांमध्ये यूपीए सरकारने केला होता, तोच मोदी सरकारने आता 1670.70 रुपयांमध्ये केला आहे. म्हणजेच काँग्रेसने 2012 साली 526.1 कोटी रुपयांमध्ये एका राफेल विमानासाठी केलेला करार मोदी सरकारने 1670.70 कोटी रुपये केला. सुरजेवाला यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालाची प्रत जारी करत मोदींनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.