Breaking News

कराटे हा आत्मसंरक्षणाचा क्रीडा प्रकार - हारुन शेख


नगर - कराटे हा आत्मसंरक्षणाचा क्रीडा प्रक़ार आहे. त्यामुळे स्व:संरक्षणाबरोबरच आपले शारीरिक आरोग्य सुदृढराहण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण हे घेतले पाहिजे. त्यामुळे शरीराबरोबरच मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. आज क्रीडाक्षेत्रात आपले करिअर होऊ शकते हे खेळाडूंनी जाणले पाहिजे. आपणास ज्या खेळात प्रविण्य असले त्या खेळात कठोरमेहनत आणि नियमित सराव केल्यास चांगली कामगिरी होऊ शकते. आज या ठिकाणी झालेल्या विविध बेल्ट परिक्षेतविद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमामुळे यश मिळविले आहे, असेच परिश्रम केल्यास भविष्यातही ते चांगली कामगिरी करुशकतील, असे प्रतिपादन वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हारुन शेख यांनी केले. सथ्था कॉलनीयेथील वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील यशस्वी विद्यार्थींमुख्य प्रशिक्षिक हारुन शेख यांच्या हस्ते बेल्ट प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षक रमजान शेख, अब्दुल शेख,तन्वीर खान, बिलाल शेख, आदिनाथ शिरसाठ, अर्जुन गिते, ज्योस्वा डिसुझा, मयुर माने आदि उपस्थित होते.