Breaking News

जीएसटी परिषदेकडून निर्यातदारांना मुदतवाढ


नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने निर्यातदारांना दिल्या जाणार्‍या कर सवलतीत 6 महिन्यांची मुदतवाढ केली आहे. निर्यातदारांना आता 1 ऑक्टोबरपर्यंत याचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर ई-वॉलेट योजना लागू केली जाणार आहे. परिषदेने मागील वर्षी 6 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत निर्यातदारांना जीएसटीमुळे आयातीमध्ये येणार्‍या अडचणींवर चर्चा केली होती. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून 31 मार्चपर्यंत अशा आयातीवर जीएसटी-पूर्व कर सवलत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय व्यापारी निर्यातदारांसाठी खरेदी केलेल्या मालावर जीएसटी देय रकमेच्या 0.1 टक्क्यांची विशेष योजना सुरू करण्यात आली होती. यावर कायम स्वरुपाचा उपाय म्हणून 1 एप्रिलपासून ई-वॉलेट योजनेची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जीएसटी परिषदेने एका निवेदनाद्वारे दिली आहे.