नेवासा पंचायत समितीकडून लाभार्थ्यांना पत्रांचे वाटप
नेवासा पंचायत समितीच्या सेस निधीतून तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांना विविध योजनेत मंजूर झालेल्या पत्रांचे वाटप सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले, उपेक्षित घटकांना वंचित न ठेवता सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन सुनिताताई गडाख यांनी यावेळी बोलतांना केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे 20 टक्के सेस निधीतून लेडीज सायकल 310, जेन्ट्स सायकल 300, पिको फॉल मशीन 35, शिलाई मशीन 39, कडबाकुट्टी 16, इलेक्ट्रिक मोटार 14, भजनी मंडळ साहित्य 16 अशा एकूण 730 व महिला बाल कल्याण 10 % सेस निधीतून लेडीज सायकल 42, पीठ गिरणी 39 तसेच अपंग महिलांसाठी तालुक्यात 4 पीठ गिरणी या सर्वांचे मंजुर पत्राचे वाटप यावेळी पंचायत समिती सभापती सुनिताताई
गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना सौ.गडाख म्हणाल्या की सर्वात जास्त लाभार्थींच्या प्रकरणांचा पाठपुरावा केल्यामुळेच विविध योजनांचा लाभ आम्हाला तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात यश आले जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व अधिकार्यांनी देखील याकामी मोलाची भूमिका बजावली असे सांगून त्यांनी सर्व अधिकारी व सदस्यांचे कौतुक केले.
यावेळी उपसभापती राजनंदिनी मंडलिक, जि.प. सदस्य अनिलअडसुरे, दादासाहेब शेळके, श्रीमती मिनाताई शेंडे, कारभारी जावळे, सुधाकर मुंढे, किशोर जोजार, रावसाहेब कांगुणे, बाळासाहेब सोनवणे, कल्पना पंडित, कल्पना बर्डे, नगरसेवक सचिन वडागळे, अंबादास इरले, राम केंदळे, विक्रम चौधरी, दादासाहेब एडके, राजेंद्र साठे, अनंत परदेशी किशोर कुरकूटे उपस्थित होते.