Breaking News

अँटिना संशोधनात भविष्यकाळ उज्ज्वल : डॉ. पोद्दार


संगमनेर / प्रतिनिधी - मेटामटेरिअल क्षेत्रातील वैविध्यपूर्ण उपयोगीतेमुळे संशोधनास मोठा वाव आहे. विशेषतः अवकाश क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात मायक्रोवेव आणि अँटिना तंत्रज्ञानामार्फत भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन अमेरिकन सिनर्जी उद्योग समूहातील विख्यात शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार पोद्दार यांनी केले.

अमृवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालायामध्ये {दि. १६} आयोजित करण्यात आलेल्या आय. ई. ई. ई. ए. पी. एस. आणि “साईट” या विध्यार्थी विभागांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संस्थेचे प्राचार्य एम. ए. व्यंकटेश, अधिष्टाता डॉ. एम. आर. वाकचौरे आणि आय. ई. ई. ई. अध्यक्ष आणि ई. टी. सी. विभाग प्रमुख डॉ. आर. पी. लबडे आणि समन्वयक प्रा. महेश कडू आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. अजयकुमार पोद्दार यांनी आय. ई. ई. ई. मधील समूह व त्यांच्या संशोधनाच्या वाटचालीबद्दल मार्गदर्शनपर भाष्य केले. संस्थेचे अध्यक्ष माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, विश्वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख यांनी या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. सूत्रसंचालन तेजल थोरात आणि संप्रति लांजेवार यांनी केले. प्रा. महेश कडू यांनी आभार मानले.