लाळ खूरकुत लसीकरणास भांबोर्यात प्रारंभ
भांबोरा पशुवैद्यकिय दवाखान्यांतर्गत येणार्या अकरा गावांमध्ये सुमारे 8 हजार जनावरांना ही लस टोचली जाणार आहे. जनावरांना लाळ खूरकुतचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी शासनामार्फत दरवर्षी ही मोहीम राबविली जाते. परिसरातील पशुपालकांनी जनावरांना ही लस टोचून घेण्याचे आवाहन डॉ. छत्रे यांनी केले आहे. लसीकरण मोहीमप्रसंगी सरपंच अशोक चव्हाण, मा. चेअरमन गणपत लोंढे, रावसाहेब लोंढे, काका जगताप, अरुण लोंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.