हनुमान जयंतीनिमित्त खेडला हरिनाम सप्ताह
कर्जत तालुक्यातील खेड येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि. 27) सप्ताहाचा प्रारंभ होत असुन शनिवारी सांगता होत आहे. खेडच्या हनुमान मंदिर येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.हभप. तुषार महाराज मोरे हे व्यासपीठ चालक आहेत. सप्ताहात पहाटे 5 ते 7 वेळेत काकडा, दुपारी गाथाभजन, सायं. 5 ते 6 प्रवचन, सायं. 7 ते 8 हरिपाठ तर रात्री 9 ते 11 या वेळेत हरिकीर्तन होणार आहे. सप्ताहात भिगवणचे हभप. पांडुरंग महाराज सातपुते, हभप. संतोष महाराज गाडेकर, अकोले येथील हभप. संदीपान महाराज शिंदे, खेडचे हभप. सतिश महाराज मोरे यांची कीर्तनसेवा होणार आहे. शनिवारी सकाळी 10 ते 12 वाजता पुणे येथील ज्ञानेश्वर महाराज खराडे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहात अमर वाघमारे हे मृदंगाचार्य असणार आहेत. कीर्तनसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन खेडच्या भजनी मंडळीकडून करण्यात येत आहे.